Tuesday, May 31, 2011

कुणासाठी कुणीतरी


कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
संपल्या वाटेवरही आस ठेऊन जगत असत.
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
हसताना उगाचच लपून डोळे पुसट असत...
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
स्वप्नातही वाट बघून हळूच कूस बदलत असत...
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
एक कटिंग चहासाठी भागीदार शोधत असत...
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
नसलेल्या शब्दांमधले गाणे गुणगुणत असत....
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
कधी भानावर येऊन स्वता:लाच हसत असत....
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
मावळत्या  संध्याकाळी कोणी उमलत असत...
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
लताच्या स्वरातले ओळखीचे भाव ऐकत असत....
 
कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
भेटूनदेखील अनोळखी बनून वावरत असत....
 
कधी कधी कोणी कुठे झुरतच नसत...
तरी पण हूरहुर लावत दूर जात असत.....

कुणासाठी कुणीतरी रोजच झुरत असत....
कधीतरी भेटू म्हणत रोज हरवत असत..