Sunday, March 15, 2009

Recession स्वर्गातले

Recession चा फटका जेव्हा स्वर्गातही बसला,
इन्द्रासोबत तेव्हा सारा देव-दरबार हादरला....
देव-लोकांच्या ओफिसातले A.C. झाले बंद,
वायुदेवाला म्हणले सारे, तूच कर आता आम्हास थंड....
वायुदेव यावर हसला एक वार
म्हणाला माझ्या कंपनीच्या लोकांनी केला आहे बंड...
जी वायुदेवाची तीच सुर्याची गत झाली,
Load shedding साठी त्याची overtime सुरु झाली....
Night Shift सुर्याची देवांच्या अंगाशी आली,
झोपेतही Recession त्यांच्या नशिबी आली.....
मंदीपाई देवांनी वाहने पण विकली,
चालून चालून zero figure गणपतिची झाली....
गरुड़ विकून विष्णुदेखिल पायी कामास जाऊ लागला,
अन् शेषनाग परवडेना म्हणुन खाटेवरच घोरु लागला......
इन्द्र-दरबारच्या अप्सरांचा सुरु झाला lay out....
अन् स्वर्गाच्या दारावर No vacancy चा दिसू लागला Cut out.
मेलेला माणूस यम परत धरतीवर सोडू लागला,
यमलोकिचा धंदा सोडून पृथ्वीवरच Job शोधू लागला।
ब्रम्हदेव मात्र अजुनही खंबीर राहिले होते,
कारण माणसाकडून जाता-जाता एक गोष्ट ते शिकले होते....
असल्या टिनपाट संकटाना तो हसत सामोरा जातो,
देवाकडे बघण्याआधी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेउन असतो .....
देवाकडे बघण्याआधी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेउन असतो .....


--> अभिजीत कुळकर्णी

No comments:

Post a Comment